विवाहितेची आत्महत्या

Foto

संभाजीनगर, छत्रपती (प्रतिनिधी) : ३४ वर्षीय विवाहितेने घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बकवालनगर येथे बुधवारी (दि.६) सकाळी उघडकीस आली. योगिता गणेश सावंत (रा. गरवारे गेट समोर, बकवालनगर वाळूज) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. योगिता या बकवालनगर येथे भगवान काकडे यांच्या घराच्या बाजूला वास्तव्यास आहे. बुधवारी सकाळी त्या काकडे यांच्या घरात आल्या होत्या. घरातील लोकांसोबत चर्चा सुरू असतानाच काही कळायच्या आत योगिता दुसऱ्या मजल्यावर गेल्या व तेथून खाली उडी मारली.
त्यांना जखमी अवस्थेत भगवान काकडे व सिद्धेश्वर गिरी यांनी उपचाराकरीता घाटी न रुग्णालयात दाखल केले असता, तयोगितास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी वाळूज पोलीस र ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद न करण्यात आली असून पुढील तपास पोहे. जगताप करीत आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions